Pimpri : बसमधून ज्येष्ठ नागरिक सोन्याची चेन लंपास

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील 28 हजारांची सोन्याची चेन लंपास केली. ही घटना स्वारगेट ते मोरवाडी पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गुरूवारी घडली.

प्रभाकर बाळकृष्ण कुलकर्णी (वय 73, रा. स्पाईन रोड, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुलकर्णी गुरूवारी कात्रज- निगडी पीएमपीएमएलने मोरवाडी येथे येत होते. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 28 हजार 600 रूपयांची सोन्याची चैन लंपास केली. फौजदार निमगिरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.