New Short Film: लॉकडाऊन असाच चालू राहिला तर… भीषण वास्तवावर भाष्य करणारा लघुपट!

'जन्म संपायला हवा' लघुपट यूट्यूबवर प्रदर्शित

एमपीसी न्यूज – 24 मार्च रोजी एक दिवसाचा लॉकडाऊन केला गेला. नंतर तो वाढत गेला, वाढतच गेला… अजूनही तो वाढतच गेला तर… गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या सततच्या लॉकडाऊन आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यावर लावलेले निर्बंध यावर भाष्य करणारा “जन्म संपायला हवा!” हा नुकताच प्रदर्शित झालेला लघुचित्रपट पाहिला.

सध्या कोरोना महामारीचे संकट उभे असता अशा परिस्थितीमध्ये आपण एकमेकांपासून दूर होत गेलो आहोत. पण हे दूर होणं, नुसताच एकलकोंडं होऊन राहणं कितीपत निरोगी ठेवेल? हे सजीवत्वाच लक्षण असू शकतं का? असा एक वैचारिक संदेश देण्याचा चांगला प्रयत्न यामार्फत केला आहे. या आपत्तीच्या काळात देखील अनेकांनी लोकांच्या गरजेचा फायदा घेऊन बाजार चालविला हे कितीपत योग्य आहे? याचे परिणाम काय होतील? असा एक तुमचा आमचा सर्वांचा आतला आवाज यामध्ये ऐकू येतो.

अगदी प्रत्येकाच्या मनातलं भाष्य केलं असल्यानं ज्याला त्याला भावतंच.

Youtube वर प्रदर्शित केल्याने सगळ्यांना हा लघुचित्रपट पाहता येऊ शकतो..

अवघ्या पाचच मिनिटात इतकं काही हा चित्रपट सांगून जातो की आपण विचारात पडतो, समाजाचं आणि स्वतःच आत्मपरीक्षण करायला लावणारा हा लघुपट आहे.

अगदीच लॉकडाऊन मध्ये जे काही काही घडत गेले ते हुबेहूब दाखवण्यात आलेले आहे. आणि असेच जर पुढे चालत राहिले तर काय काय होईल? अशी एक सतत वाटत राहणारी भीती यातून स्पष्टपणे व्यक्त होते. जे लोक खरंच काळीज घेऊन जगत असतील, ज्यांना माणुसकीबद्दल जाण असेल त्यांना यातील दृश्ये आणि मांडलेले वास्तव नक्कीच भावेल.

विश्वजीत शिंदे
(प्रोडक्शन मॅनेजर, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ, जि.कोल्हापूर)

पाहा संपूर्ण लघुपट…. जन्म संपायला हवा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.