Pimpri : एसटी महामंडळाच्या सहकार्याने कोकण प्रवासी संघातर्फे खास गणपतीसाठी विशेष गाड्या

एमपीसी न्यूज – निगडी येथील कोकण प्रवासी संघातर्फे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी वल्लभनगर येथून 30, 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी खास गाडया सोडण्यात आल्या आहेत.

कणकवली, मालवण, सावंतवाडी, देवगड, दोडामार्ग, राजापूर, कुडाळ, आंबोली, वेंगुर्ला या ठिकाणी तीन दिवस विशेष गाडया वल्लभनगर येथून सोडण्यात आल्या. मागील 19 वर्षे हा उपक्रम अव्याहतपणे सुरु असून यंदा पहिल्या दिवशी 4 गाड्या, दुसऱ्या दिवशी 17 गाड्या व तिसऱ्या दिवशी 2 गाड्या सोडण्यात आल्या.

या उपक्रमासाठी संघाचे अध्यक्ष दादा हाटले, बबन दळवी, जयेश भुवड, बापू सावंत, महेश देसाई, शशिकांत राणे, भाई दळवी, सुभाष हाटले, प्रकाश चव्हाण, नितीन चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.