New strain of coronavirus : कोरोनाच्या नव्या स्ट्रेन महाराष्ट्रात दाखल?

इंग्लंडहून नागपुरात आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातलेला असताना इंग्लंडून नागपुरात दाखल झालेला एक तरुण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. चिंताजनक बाब अशी की इंग्लंडच्या प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा 28 वर्षीय तरुण कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा रुग्ण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे प्रशासन आता सतर्क झाले आहे. बाधित तरुणावर उपचार सुरु असून त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

तरुण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत पोहोचण्याचंही काम सुरु झालं आहे. इंग्लंडमधून आल्यानंतर हा तरुण नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.

 समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा 29 नोव्हेंबर रोजी नागपुरात आला होता. भारतात उतरल्यानंतर विमानतळावर त्याची कोरोना चाचणी झाली होती. पण त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. काही दिवसांनंतर तरुणाला कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यानंतर 15 डिसेंबरला त्यानं पुन्हा चाचणी केली.

ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या तरुणाला वास ओळखता न येण्याचं लक्षण दिसत असून त्याची प्रकृती उत्तम आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याचे कुटुंबिय आणि मित्र परिवाराचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.