Talegaon : बालाजी मंदिरात स्तोत्र मंजिरी ब्रह्मउत्सव उत्साहात

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील बालाजी मंदिरात आयोजित स्तोत्र मंजिरी ब्रह्मउत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवाचे गुरुवारी दि. 31 ते शनिवार दि. 2 या काळात आयोजन करण्यात आले होते. उत्सवात आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची मने जिंकली.

या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बालाजी प्रतिष्ठान व सृजन नृत्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांग संस्कृत शोल्काचे संगीताच्या तालावर गायन व नृत्य सादर करण्यात आले. त्यामध्ये सृजन नृत्यालयाच्या प्रमुख मिनल कुलकर्णी व त्यांचा शिष्य साहिल कडू यांनी अर्ध नटनटेश्वर हे नृत्य सादर केले.

या कार्यक्रमात तळेगावची गायन कोकिळा समजली जाणारी संपदा थिटे हिने मुख्य गायिकेची भूमिका पार पाडली. तसेच डॉ. विनय लिमये यांनी विविध भाषेतील स्तोत्राचे उत्कृष्ट गायन करून साथ दिली. मृदुंगाचार्य म्हणून प्रसिद्ध मृदूंग वादक मावळ भूषण सचिन इंगळे यांनी साथ केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.