Pune : पुणे मेट्रोचा मुंबई मेट्रो प्रमाणे विस्तार करणार – अजित पवार

पुण्याहून पिंपरी-चिंचवडला जाणा-या मेट्रोचे पुणे-पिंपरी-चिंचवड महामेट्रो असे नामकरण

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोचा मुंबईप्रमाणेच विस्तार करणार, असे अजित पवार यांनी सांगितले. मुंबई येथे मेट्रोच्या आढावा बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले असून पुण्याहून पिंपरी-चिंचवडला जाणा-या मेट्रोचे पुणे-पिंपरी-चिंचवड महामेट्रो असे नामकरण करण्यात येणार आहे. तर अन्य मार्गांचे पुणे मेट्रो असेच नाव राहणार आहे, अशी माहितीही देण्यात आली. 

या बैठकीत मेट्रोचे प्रस्तावित ६ कारिडाॅर टप्प्याटप्प्याने सुरू करण्याऐवजी सगळ्या काॅरिडाॅरचे काम सोबतच सुरू करण्याचे करून त्यासंबंधी डीपीआर करण्याचे आदेश देण्यात आले. पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी कात्रज होणार,  वनाज रामवाडी मार्ग वाढवून चांदणी चौक ते वाघोली असा होणार, शिवाजीनगर हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रोचा मार्ग शिवाजीनगर माण असा वाढवणार, हडपसर स्वारगेट हा मार्ग नव्याने प्रस्तावित, निगडी चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर खडकवासला ते स्वारगेट हा ही मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. वारजे ते शिवाजीनगर या मार्गाचा विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातला एचसीएमटीआर २४ मीटर ऐवजी ८ मीटर होणार, अशीही माहिती देण्यात आली.

स्वारगेट ते लोणी – काळभोरपर्यंत मेट्रो मार्गाला मान्यता 

स्वारगेट ते लोणी – काळभोरपर्यंत मेट्रो मार्ग करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली होती. त्याला अखेर यश आले. सोमवारी मुंबई येथे मंत्रालयात भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश अधिका-यांना दिले.

मेट्रोचा मार्ग पूर्वी शिवाजीनगर ते उरुळीदेवाची असा ठरवण्यात आला होता. या ऐवजी स्वारगेट – हडपसर – लोणीकाळभोर असा मार्ग करावा. त्याप्रमाणे डीपीआर करायचे आदेश अजित पवार यांनी महामेट्रो आणि ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना दिले. पहिल्याच भेटीत योग्य मागणी मान्य केल्याबद्दल योगेश ससाणे यांनी समस्त सोलापूर रोडवरील लाखो नागरिकांतर्फे अजित पवार यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.