New Teaser disliked by viewers: आणखी एका टीझरवर डिसलाइक्सचा भडिमार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील स्टार किड्सवर मागील काही दिवसांपासून जोरदार टीका होत आहे. याआधी महेश भट्ट यांच्या सडक 2 ने डिसलाइकचा विक्रम केला होता.

एमपीसी न्यूज – अभिनेता आणि स्टारकिड इशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘खाली पीली’ असं नाव असलेल्या या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर प्रेक्षकांना फारसा आवडलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी या टीझरवर डिसलाइकचा भडिमार केला आहे. काही तासांत आतापर्यंत सात लाखांपेक्षा अधिक डिसलाइक या टिझरला मिळाले आहेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील स्टार किड्सवर मागील काही दिवसांपासून जोरदार टीका होत आहे. याआधी महेश भट्ट यांच्या सडक 2 ने डिसलाइकचा विक्रम केला होता. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी महेश भट्ट यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. त्यांचे रिया चक्रवर्तीशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध हा चर्चेचा विषय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या सडक 2 वर प्रचंड डिसलाइक्स आले.

त्यानंतर आता नेटकऱ्यांनी ‘खाली पीली’ या चित्रपटावर निशाणा साधला आहे. या चित्रपटात स्टारकिड असलेले इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे आणि अभिनेत्री नीलिमा अझीमचा मुलगा ईशान खट्टर यांना चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच टीकेला सामोरे जावे लागत आहे. ‘खाली पीली’च्या टिझरला काही तासांत आतापर्यंत युट्यूबवर सात लाख 19 हजार डिसलाइक मिळाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.