Pune Crime News : सायबर चोरट्यांची नवी टेक्निक; टेक्स्ट मेसेज पाठवून ज्येष्ठ नागरिकाचे 5 लाख हडपले

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून ऑनलाईन फ्राॅडचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरटे दरवेळी काहीतरी नवीन काहीतरी युक्त्या वापरत सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत असतात. एखादी पद्धत सर्वसामान्य नागरिकांना माहित झाली की नवीन टेक्नीक काढून लोकांचा विश्वास संपादन करतात आणि त्यांच्या बँक खात्यातून रोख रक्कम लंपास करतात. पुणे शहरातील कोंडवा भागातून एक असा एक प्रकार उघडकीस आला आहे.

एका ज्येष्ठ नागरिकाला बँक खाते ब्लॉक केल्याचा टॅक्स मेसेज पाठवला. त्यानंतर एक लिंक पाठवली आणि त्यात पॅनकार्ड टाईप करायला भाग पाडून तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. एका 57 वर्षीय नागरिकाने यासंबंधी फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या मोबाईलवर त्यांचे बँक खाते ब्लॉक केल्याचा एक टेक्स्ट मेसेज आला. त्यानंतर लगेचच एक लिंक शेअर करून त्यावर लॉगिन करून नेट बँकिंग अपडेट करून पॅन कार्डचा नंबर टाकण्यास सांगितले. त्यानुसार या ज्येष्ठ नागरिकाने पॅन कार्ड नंबर टाकला असता त्यांच्या खात्यावरून पाच लाख चार हजार रुपये सायबर चोरट्यांनी दुसऱ्या बँक खात्यावर वळते केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.