Pune : सुप्रसिद्ध एसपी’ज बिर्याणीत आढळली अळी

ग्राहकाने जाणूनबुझून केलेले कृत्य - हॉटेल व्यवस्थापक

एमपीसी न्यूज – पुण्यातील सुप्रसिद्ध एसपीज बिर्याणी हाऊस येथील बिर्याणीत अळी आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच व्यवस्थापकाकडून दमदाटी करण्यात आल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. ही घटना आज रविवारी (दि.2) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

विरेंद्रसिंग ठाकूर हे त्यांच्या मुलासोबत आज दुपारी बाराच्या सुमारास जेवण्यासाठी गेले होते. त्यांनी बिर्याणी ऑर्डर केली. यावेळी त्यांच्या मुलाच्या ताटात अळी निघाली. त्यामुळे त्यांनी ही बाब हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, कर्मचा-यांनी त्यांनाच दमदाटी केली. त्यामुळे ग्राहक विरेंद्र ठाकूर यांनी अळी आढळलेल्या बिर्याणीचा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला. तसेच हॉटेलमध्ये पुन्हा असे प्रकार होऊ नये, ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी, असेही मत त्यांनी व्हिडिओतून मांडले. विरेंद्रसिंग ठाकूर हे राष्ट्रीय नेमबाज असून त्यांच्या कडे राष्ट्रीय पदक आहे

या एकूण प्रकारावर व्यवस्थापक बाळासाहेब वाकरेकर यांनी उलटपक्षी ठाकूर यांच्यावरच जाणूनबुझून कृत्य केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यामते ग्राहकाचा हा कांगावा असून व्यवस्थापनाची यात कोणतीही चूक नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.