Maharashtra Exit PolL : महायुतीला 8 जागांचा फटका तर आघाडीला 14 जागांचा फायदा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसणार आहे. 2014 च्या निवडणुकीत युतीला एकूण 42 जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र युतीला 34 जागेवर समाधान मानावे लागेल, असे निष्कर्ष एक्झिट पोलनुसार समोर येत आहेत. एबीपी, पोल डायरी आणि सी व्होटर या एक्झिट पोलने ही आकडेवारी दिली आहे. एबीपी नुसार भाजप शिवसेना 17 +17 जागा असतील, तर पोल डायरीनुसार भाजप 20 आणि शिवसेनेला 14 जागा असतील तर सी व्होटर नुसार हे प्रमाण भाजप 19 आणि शिवसेना 15 जागा असे दिले आहे. मात्र, तिन्ही एक्झिट पोल नुसार महायुतीला 8 जागांचा फटका बसणार असे सांगितले आहे. 

एक्झिट पोलनुसार यंदा शिवसेनेपेक्षा भाजपला जास्त नुकसान होणार आहे. तर राष्ट्रवादीच्या जागा यावेळी वाढणार असून राष्ट्रवादीला 9 जागा मिळू शकतील तर काँग्रेसला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. आणि इतर पक्षांना 1 जागा मिळू शकते. तर युतीला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी देखील यावेळी कमी झाली आहे. यंदा केवळ 42.6 टक्के इतके मतदान झाले आहे. तर राष्ट्रवादीकडे मतदानाचा टक्का वाढला आहे.

काही विश्लेषकांचे मत भाजप शिवसेना युतीतील विधानसभेतील परिस्थिती त्यांच्यातील सततचे वाद यामुळे हा फटका बसला तर तेच मत राष्ट्रवादीकडे वळले असाही अंदाज काहींनी दिला आहे. तर नरेंद्र मोदींची लोकप्रियतेची लाट ओसरल्यामुळे युतीला हा फटका बसल्याचेही काही राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.