Hinjawadi : पावसात छत्री पांघरून जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – मेडिकलमधून औषधे घेऊन जात असलेल्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे ही महिला जोरदार पाऊस असल्याने छत्री पांघरून जात होती. चोरट्यांनी छत्री बाजूला सारून मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शनिवारी (दि. 27) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास बावधन येथे घडली.

शुभदा अरुण पुजारी  (वय 74, रा. चांदणी चौक, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोटारसायकलवरील अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभदा आणि त्यांचे पती शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी पायी चालत गेले. औषधे खरेदी करून घरी परत येत असताना जोरदार पाऊस असल्याने दोघांनीही छत्री पांघरली होती. अचानक मागच्या बाजूने आलेल्या दुचाकीवरील दोन इसमांनी शुभदा यांची छत्री बाजूला सारून त्यांचे 45 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87950e103c0d10dc',t:'MTcxMzk1MDgyMi4xODUwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();