Lonavala : रेल्वे मार्गावरील मंकी हिल जवळ दरड कोसळली

एमपीसी न्यूज : मान्सूनच्या पावसाला सुरुवात होताच खंडाळा घाटातील मंकी हिल जवळ रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडल्याने रेल्वे मार्गावरील वाहतूक रात्रीच्या सुमारास विस्कळीत झाली होती.

खंडाळा खोपोली घाटातील मंकी हिल व ठाकूरवाडी केबीन दरम्यान असलेल्या किमी 117/500 जवळ आज रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास डाऊन व मिडल या दोन लाईनवर डोंगरावरुन दरड खाली आल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. या घटनेनंतर पुण्याच्या दिशेने येणारी सह्याद्री एक्सप्रेस ठाकूरवाडी जवळ थांबविण्यात आली होती. डाऊन मेन लाईन पूर्ण बंफ झाल्याने या रुळावरील सह्याद्री एक्सप्रेस मागे घेत डाऊन मिडल लाईनवर घेत पुण्याकडे रवाना करण्यात आली. या दुर्घटनेमुळे पुण्याच्या दिशेने येणार्‍या १६ गाड्या उशिराने धावत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.