Charholi : औषध दुकानात 32 हजारांची चोरी 

एमपीसी न्यूज – औषध दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी 32 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चऱ्होली येथे शुक्रवारी (दि. 30) पहाटे उघडकीस आली. 

याप्रकरणी मनोज भास्कर चव्हाण (वय 21, रा. चऱ्होली) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी चव्हाण यांचे चऱ्होली येथे शिवम मेडिकल नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. शुक्रवारी पहाटे दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतील 32 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला, असे पोलिसांनी सांगितले. दिघी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.