Pimpri : हौस पूर्ण करण्यासाठी महागडी दुचाकी चोरून पळ काढणारा जेरबंद  

एमपीसी न्यूज –  स्वतः ची हौस पूर्ण करण्यासाठी महागडी दुचाकी चोरून पळ काढणार्‍या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लाखांची दुचाकी जप्त केली आहे. ही घटना चिंचवड येथील डबल ट्री हॉटेलसमोर बुधवारी दुपारी घडली.

_MPC_DIR_MPU_II

सागर संजय सिंग (वय-21, रा. हिंजवडी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम सुनील कोंथबिरे (वय-28, रा. इंदिरानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी शुभम यांची केटीएम ड्युक-200 ही दुचाकी विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहून आरोपी सागरने शुभम यांच्याशी संपर्क साधला. आरोपी सागरला केटीएम दुचाकी घेण्याची इच्छा होती. मात्र, त्याच्याकडे पैसे नसतानाही त्याने फिर्यादी शुभम यांच्याशी संपर्क साधून दुचाकी घेण्याची इच्छा व्यक्त केली. दुचाकी बघण्याच्या बहाण्याने शुभम यांना जोरदार धक्का देऊन आरोपी दुचाकी घेऊन पसार झाला. मात्र, पोलिसांनी आरोपीला त्वरीत अटक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.