Pimpri : महापालिकेतील 18 कर्मचा-यांच्या बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांच्या दुस-या टप्प्यातील अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 10 लघुलेखक, एक कॉम्युटर ऑपरेटर, एक लिपिक, दोन शिपाई, चार वाहनचालकांचा समावेश आहे.  

महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 मध्ये धोरण निश्‍चित करण्यात आले आहे. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात अधिकारी कर्मचा-यांच्या बदल्या केल्या जातात. त्यानुसार एकाच विभागात सेवेचा सहा वर्ष पूर्ण केलेल्या अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बढतीस पात्र ठरणा-या अधिका-यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या विविध विभागांमधील 91 अधिकारी व कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

‘यांच्या’ झाल्या अंतर्गत बदल्या!

लघुलेखक

सिद्राम कांबळे यांची ‘क’ श्रेत्रीय कार्यालयातून नगरसचिव विभागात बदली झाली आहे. अनिता राजापुरे नगरसचिव विभागातून – नगररचना विभागात, सुनीता पळसकर स्थापत्य विभागातून – प्रशासन, वैशाली गायकवाड प्रशासनातून स्थापत्य विभाग, रेवती टिपणीस ‘ड’  क्षेत्रीय कार्यालयातून प्रशासन विभाग, रावसाहेब राठोड नगररचना विभागातून ‘इ’ व ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, राजू ठाकरे ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातून लेखापरिक्षण विभागात बदली झाली आहे. विजयश्री देसाई ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयासह ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी, स्वाती निमगुळकर ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयासह ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी, नलिनी चाबुकस्वार यांची ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातून ‘ड’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात बदली झाली आहे.

कॉम्प्युटर ऑपरेटर राहुल शेडगे यांची प्रशासनातून माहिती व तंत्रज्ञान विभागात बदली झाली आहे. लिपिक तानाजी घाडगे यांची प्रशासनातून करसंकलन विभागात बदली झाली आहे. त्याचबरोबर दोन शिपाई, चार वाहनचालकांच्या बदल्या झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.