Pune : कर्वेनगरमध्ये टिकाव कुऱ्हाडीने जवळपास 15 गाड्यांची तोडफोड

एमपीसी न्यूज – कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनी येथे टिकाव कुऱ्हाडीने जवळपास 15 गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना आज सोमवारी (दि.22) पहाटे अडीचच्या सुमारास घडली.  

याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे अडीचच्या सुमारास कर्वेनगर येथील वाहन तोडफोडीच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दोन ते तीन जणांनी मिळून टिकाऊ कुऱ्हाडीने गाड्यांची तोडफोड केली आहे. तर एकूण 15 गाड्या फोडल्या असून 12 चारचाकी असून 3 दुचाकी आहेत. त्यातील दोघांना बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतले असून ते त्याच परिसरात राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे. यातील आरोपींवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे.

यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.