_MPC_DIR_MPU_III

New Web Series Of Abhishek: नव्या इनिंगसाठी अभिषेक झाला सज्ज

New Web Series Of Abhishek: Abhishek bachchan is ready for a new innings या पोस्टरवर असलेल्या गूढ चित्रामुळे नेमकी ही सीरिज कोणत्या विषयावर आधारित असेल हा प्रश्न प्रेक्षकांना भेडसावत आहे.

एमपीसी न्यूज- ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या इतकी लोकप्रियता त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला मिळाली नाही. तरीदेखील अभिषेकने जे काही काम केले त्यातून त्याने आपला ठसा उमटवला. सध्या त्याचे फारसे चित्रपट येत नसून तो आता वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच तो ‘Breathe In To The Shadows’ या वेबसीरिजमध्ये झळकणार असून या सीरिजमधील त्याचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय आणि गाजलेल्या अॅमेझॉन प्राइमच्या आगामी ‘Breathe In To The Shadows’ या नव्या वेबसीरिजमध्ये अभिषेक झळकणार आहे. नुकतेच या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

या पोस्टरवर असलेल्या गूढ चित्रामुळे नेमकी ही सीरिज कोणत्या विषयावर आधारित असेल हा प्रश्न प्रेक्षकांना भेडसावत आहे. त्यातच अभिषेकचा पहिला लूकही समोर आला असून दिवसेंदिवस या सीरिजविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढताना दिसते.

या पदार्पणाविषयी उत्सुक असलेला अभिषेक याविषयी आपले मत व्यक्त करताना म्हणाला, ‘ब्रीद: इन टू द शॅडोज या सीरिजच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच वेबविश्वात पदार्पण करत असल्यामुळे मला फार आनंद होत आहे आणि त्यासोबतच यात काम करण्याची उत्सुकतादेखील आहे.

या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासून मला सतत प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हे सारं पाहून मी खरंच भारावून गेलो आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसंच त्यांच्यामुळे या नव्या वेबविश्वात पदार्पण करण्यासाठीचा माझा आत्मविश्वास वाढत आहे. या सीरिजच्या माध्यमातून उत्तम कथानक प्रेक्षकांना पाहता येणार आहे’.

याआधी २०१८ मध्ये अॅमेझॉन प्राइमवर ‘ब्रीद’ ही सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यात दाक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवन आणि अमित साध यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

त्यामुळे या सीरीजचा पुढील सीझन प्रदर्शित व्हावा अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत होती. सुरुवातीला ‘Breathe In To The Shadows’ चं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर हा ब्रीदचा पुढचा सीझन असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र हा पुढील सीझन नसून नवीन वेबसीरीज आहे.

सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असलेली ही सीरीज येत्या १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरीजमध्ये अभिषेक बच्चनसह अभिनेता अमित साध, सैयामी खेर आणि निथ्या मेनन देखील झळकणार आहे.

निथ्या मेननचादेखील हा डिजिटल डेब्यू असणार आहे. याची निर्मिती अबुंदंतिया एन्टरटेन्मेंट यांनी केली असून दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केलं आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1