NewDelhi : ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांचं निधन

एमपीसी न्यूज – माजी कायदामंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार आहे.

देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्ली येथील त्यांनी निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

राम जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्टासह अनेक कोर्टात वकिली केली.सहाव्या आणि सातव्या लोकसभेत मुंबईतून भारतीय जनता पक्षाकडून राम जेठमलानी संसदेत निवडून गेले होते. वकिलीबरोबर जेठमलानी यांनी केंद्रातही मंत्री म्हणून काम पाहिले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये जेठमलानी यांनी कायदा मंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून काम केले होते.तर, जेठमलानी यांनी २०१४ मध्ये लखनऊ लोकसभा मतदारसंघातून वाजपेयी यांच्याविरूद्ध निवडणूक लढवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.