Pune News : नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकरानी घेतली शरद पवारांची भेट

एमपीसी न्यूज :  कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर,आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा (Pune News) शरद पवार यांची शिवाजीनगर येथील मोदी बाग येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.यावेळी शरद पवार यांनी रविंद्र धंगेकराना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे 10 हजार 940 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच रविंद्र धंगेकरानी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार गिरीश बापट यांची देखील दोन दिवसापूर्वी आमदार रविंद्र धंगेकर यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि यावेळी गिरीश बापट यांनी रविंद्र धंगेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या.

Hinjawadi News : विचारणा केली म्हणून महिलेचा विनयभंग

त्याच दरम्यान आज सकाळी शिवाजीनगर येथील मोदी बाग येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची रविंद्र धंगेकर यांनी भेट घेतली.(Pune News) त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे पक्षाचे नेते मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.