Pune : नवनिर्वाचित आमदार सुनील टिंगरे यांनी धुतले सफाई कामगारांचे पाय

एमपीसी न्यूज – दिवाळी संपली आणि आपण पुन्हा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात अडकलो. पण या दिवाळीच्या धावपळीमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की दिवाळी सण साजरा करत असताना कळत नकळत आपल्याकडून रस्त्यावर कचरा होतो, घाण होते.

सणवार असो वा उन्हाळा हिवाळा पावसाळा या तीनही ऋतूत सफाई कामगार आपल्या भागात सफाईचे काम अत्यंत चोखपणे बजावत असतात. स्वतः सुटी न घेता दिवाळी सणात आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार वडगांवशेरीचे नवनिर्वाचित आमदार सुनील टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी फुलेनगर पुणे परिसरातील सफाई कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. सुनील टिंगरे यांनी सफाई कामगार यांचे पाय धुतले व पुष्पहार घालून भेटवस्तू देऊन सफाई कामगारांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे आयोजन वडगांवशेरी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिवानी उमेश माने यांच्या वतीने करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.