Wakad : वाकडमध्ये नववधूची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात नववधूने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 15) सकाळी सातच्या सुमारास वाकड येथे घडली.

प्रणिता सिद्राम जाधव (वय 19, रा. वाकड) असे आत्महत्या केलेल्या नववधूचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिता आणि सिद्राम यांचा एक महिन्यापूर्वी विवाह झाला होता. जाधव कुटुंब मूळ लातूर येथील आहे. सिद्राम एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. शुक्रवारी संध्याकाळी सिद्राम कामावर गेला. रात्री प्रणिता यांनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी सिद्राम घरी आला असता हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.