Wakad : लग्नात मानपान न केल्याने विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज – लग्नात मानपान केला नाही म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत छळ केला. ही घटना ताथवडे येथे घडली.

पती समाधान लोंढे, सासरा बाबासाहेब लोंढे, सासू इंदूबाई लोंढे, दीर विकास लोंढे, नणंद अर्चना कांबळे, नंदावा प्रकाश कांबळे (सर्व रा. शिवतिर्थनगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार मार्च 2009 पासून सुरू आहे. विवाहिता सासरी नांदत असताना आरोपींनी लग्नात मानपान केला नाही. घरातील वस्तू दिल्या नाही. या कारणावरून तिचा छळ सुरू केला. वेळोवेळी तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.