Pune News : वृत्तपत्रे, न्यायालयांच्या स्वायत्ततेचा केंद्राने संकोच केला – नाना पटोले

एमपीसी न्यूज – पुणे : वृत्तपत्रे, न्यायालये, प्रशासन यांच्या स्वायत्ततेचा संकोच केंद्र सरकारने केला, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस पक्षाने व्यर्थ न हो बलिदान असा उपक्रम हाती घेतला असून लोकमान्य टिळक यांच्या केसरी वाड्यात पटोले यांच्या हस्ते रविवारी प्रारंभ करण्यात आला.

केंद्र सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांविरुद्ध लढा पुकारावा लागेल, त्यात तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पटोले यांनी केले.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या विषयी अनुद्गार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढले. त्याबद्दल पटोले यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. राज्यपाल पदावर बसून कोश्यारी राजकारण करतात, असे पटोले म्हणाले.
.
या वेळी स्वातंत्र्यसैनिक वसंत जोशी, उषा देसाई यांचा पटोले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, डॉ. दीपक टिळक, रमेश बागवे, उल्हास पवार, मोहन जोशी आदी उपस्थित होते. उपक्रमाचे समन्वयक अभय छाजेड यांनी सर्वांचे स्वागत केले. नीता रजपूत यांनी सूत्रसंचालन केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.