Maharashtra : महाराष्ट्राच्या पुढच्या राज्यपाल सुमित्रा महाजन???

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी, कोणत्याही (Maharashtra) दिवशी केंद्राकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला जाणार आहे. आणि आता नवे राज्यपाल कोण? या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनी ‘राज्यपाल’ होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. डोंबिवलीमधील एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Dehu News : बागेश्वर महाराजांना देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराजांनी का केले माफ?

माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन या सध्या पालकमंत्री पदासाठी उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी मला माझ्या गावी परत जाण्याची इच्छा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली होती. तर, सुमित्रा महाजन यांना एकाने प्रश्न केला असता, मला महाराष्ट्राची पालक व्हायला आवडेल (Maharashtra) असे उत्तर दिले आहे. तर पार्टीला सांगा की त्यांनी मला महाराष्ट्राचं पालक करावं. मी जाईन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे पुढचा राज्यपाल सुमित्रा महाजन असतील याची जोरदार चर्चा सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.