Pune : टेकडी फोडली चूक झाली; यापुढे बाधा न पोहचवता काम करू – स्मार्ट सिटी अधिकारी

पाषाण बाणेर परिसरात 29 जूनला टेकडी फोडल्याबाबत नागरिकांशी संवाद

एमपीसी न्यूज – टेकडी फोडली ही चूक झाली. यापुढे टेकडीला हात न लावता कुठलीही बाधा न पोहोचवता काम करू, असे आश्वासन स्मार्ट सिटी संबंधित एसजीएस कन्सल्टंट व कॉन्ट्रॅक्टर पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचे इंजिनीअर व अधिका-यांनी पाषाण बाणेर परिसरातील नागरिकांना दिले. तसेच लेखी रिपोर्ट बनवून नागरिकांना आणि पुणे आयुक्तांना पाठविणार असल्याचेही सांगितले.

स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत पाषाण-बाणेर परिसरातील टेकडीच्या मागील बाजूला व्हेनेझीया सोसायटीपासून पॅन कार्ड क्लबकडील 100 मीटर अंतरावर रस्त्यासाठी 29 जूनला टेकडी फोडली. याप्रकरणी परिसरातील दक्ष नागरिकांनी तक्रार केली. यासंबंधी स्मार्ट सिटी , संबंधित SGS कॅन्सल्टंट व कॉन्ट्रॅक्टर पाटील कॉन्स्ट्रक्शन कंपनी चे इंजिनियर व अधिकारी यांनी ६ जुलै (शनिवारी) सकाळी ११ वाजता संवाद साधला. आणि विकासाच्या ओघात टेकडीला बाधा पोहचवणार नाही, अशी तत्वतः ग्वाही दिली.

तरीही, नागरिक म्हणून काम सुरू आहे तोपर्यंत रोज प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघत रहावे लागणार आहे. कालव्यांच्या भिंती पडल्यावर, धरण फुटल्यावर, भूस्खलन झाल्यावर रडून आरडाओरडा करून उपयोग नाही. चुकीचे काम होताना दिसले तर अधिकाऱ्यांना लगेच सूचित करावे लागणार आहे. गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचीही तयारी ठेवावी. नागरिक सतर्क असल्याशिवाय विध्वंस करणारा विकास आटोक्यात राहणार नाही, असे परिसरातील दक्ष नागरिकांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.