NG Haridas : भाषण करताना काँग्रेसचे एन.जी हरिदास यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष एन.जी (NG Haridas) हरिदास यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ओणम सण साजरा करण्यासाठी नायर सर्व्हिस सोसायटी (एनएसएस) यांनी आज सकाळी देहूरोड येथे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये एन. जी. हरिदास हे दुपारी भाषण करत होते. भाषण अंतिम टप्प्यात आले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना उपचारासाठी बाणेर येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण, तेथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हरिदास यांचे पार्थिव शरीर दोन दिवस पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या शवागरात ठेवण्यात येणार आहे. कारण त्यांची मुलगी हेमा हि सिंगापुर येथून त्यांच्या अंतिम दर्शनासाठी व अंतिम संस्कारासाठी येणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी थंगमणी, मुलगा हर्ष व मुलगी हेमा असा परिवार आहे.

एन.जी हरिदास हे नायर सर्व्हिस सोसायटीचे (NG Haridas) आणि श्रीकृष्ण चॅरिटेबल फाउंडेशनचे माजी अध्यक्ष होते. तसेच, चिंचवड मल्याळी समाजम व वर्ल्ड मल्याळी कौन्सिलचे ते पदाधिकारी होते.

माजी नगरसेवक बाबू नायर म्हणाले, की ”एनजी हरिदास यांच्या निधनाने मल्याळी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ज्या संस्थांमध्ये ते काम करत होते, त्या संस्थांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Pimpri Crime : गुंगीचे औषध देऊन कत्तलीसाठी जनावरांची चोरी; चार वर्षाच्या बैलाचा दुर्देवी मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.