Pimpri Chinchwad News : शहरातील अवैध वृक्षतोडी विरोधात एकवटल्या स्वयंसेवी संस्था

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने वृक्षतोड सुरू आहे. शहरातील अवैध वृक्षतोडी विरोधात विविध स्वयंसेवी संस्था एकवटल्या आहेत.

वृक्षतोड करत असताना कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसून, पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने ही वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप या संस्थानी केला आहे. वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करावी, उद्यान विभागाच्या अधिका-यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करावी तसेच, सध्याच्या ठेकेदारांना काढून टाकावे अशी मागणी या संस्थानी केली आहे.

पिंपरी चिंचवड सिटिझन फोरम, सिटीझन फॉर आद्य सभा, जेष्ठ नागरिक महासंघ, थेरगाव सोशल फाऊंडेशन, वर्ल्ड फॉर नेचर, वृक्षमित्र, सावरकर मंडळ, अविरत श्रमदान, आंघोळीची गोळी या संस्था शहरातील अवैध वृक्षतोडी विरोधात एकवटल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शहरात मोठ्या प्रमाणार वृक्षतोड होत असून संबधितांवर पालिका कारवाई करत नाही. पालिकेने वृक्ष छाटणी व वृक्षतोड यासाठी नियम कडक नियम घालून दिले आहेत. पण, या नियमांना पायदळी तूडवून पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप या संस्थानी केला आहे. पालिका एकिकडे ग्रीन पॉकेट निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे सांगते आणि दुसरीकडे अवैध पद्धतीने वृक्षतोड सुरू आहे.

संस्थेच्या पदाधिका-यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेऊन शहरातील अवैध वृक्षतोडी बाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी संस्थेच्या विविध मागणयांचे निवेदन ढाकणे यांना सादर करण्यात आले. या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सादर केली जाणार आहे.

या आहेत प्रमुख मागण्या –
– वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करावी
– उद्यान विभागाच्या अधिक-यांची सखोल चौकशी करून दोषी आढल्यास निलंबन करावे
– महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या नोडल अधिका-यांच्या मार्फत सुनावणी करावी
– पालिकेने एक्सपोर्ट कमिटी नियुक्त करावी
– पालिकेने वृक्ष संवर्धनाचा अहवाल सादर करावा
– वृक्ष पुनर्रोपण सबंधी उपलब्ध उपायांची प्रभावी अंमलबजावणी करावी

सर्व स्वयंसेवी संस्था अवैध वृक्षतोडीच्या विरोधात एकवटल्या असून चांगल्याच आक्रामक झाल्या आहेत. पालिकेच्या वतीने येत्या पंधरा दिवसात काहीच निर्णय न घेतल्य़ास आंदोलन करण्याचा इशारा या संस्थानी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.