NIA News : दहशतवादी बलबीरवर दहा लाखाचे इनाम

एमपीसी न्यूज – देशा विरुद्ध युद्ध पुकारण्याच्या (NIA News ) कटाच्या प्रकरणात हवा असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याला पकडून देण्यासाठी किंवा त्याचा ठाव ठिकाणा कळविणाऱ्यासाठी दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी (दि. 23) ही घोषणा केली आहे.
काश्मीर सिंग गलवड्डी उर्फ बलबीर सिंग (रा. गलवड्डी, लुधियाना, पंजाब) असे या दहशतवाद्याचे नाव आहे.
नवी दिल्ली येथे 20 ऑगस्ट 2022 रोजी यूपीए कायद्याच्या विविध कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेंव्हापासून तपास यंत्रणा त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप तपास यंत्रणेला त्याचा ठाव ठिकाण सापडलेला नाही. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी त्याच्यावर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
बलबीर सिंग याच्याबद्दल काही माहिती असल्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दिल्ली आणि चंदीगड येथील कार्यालयात माहिती द्यावी, असे आवाहन एनआयएकडून करण्यात आले आहे माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही एनआयएने (NIA News ) सांगितले आहे.