Nigdi: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या स्पर्धेत काळभोरनगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळ प्रथम

चिंचवडमध्ये गुरुवारी बक्षीस वितरण

एमपीसी न्यूज – पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत चिंचवड, काळभोरनगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळाला 51 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. विजेत्या मंडळांना येत्या गुरुवारी (दि. 8) चिंचवड येथे सायंकाळी पाच वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

याबाबतची माहिती  ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आज (शनिवारी) दिली. निगडीत झालेल्या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे उपाध्यक्ष हेमंत रासने,  सरचिटणीस माणिक चव्हाण, महेश सूर्यवंशी, दत्तपतं केदारी, प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील 167 मंडळे स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी 101 मंडळांना 11 लाख 41 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये चिंचवड काळभोरनगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे.  मंडळाने ‘महिला संतोष’ हा देखावा सादर केला होता. त्यांना 51 हजार रुपयांचे बक्षीस आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

चिखली, जाधववाडीतील श्री संत सावता माळी तरुण मंडळ यांना ( 45 हजार रुपये), चिंचवड येथील अखिल मंडई मित्र मंडळ ( 35 हजार रुपये), डांगे चौक येथील आनंद पार्क मित्र मंडळ ( 30 हजार रुपये) आणि चिंचवड स्टेशन येथील त्रिमूर्ती मित्र मंडळ ( 25 हजार रुपये) या मंडळांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मांडवाच्या शेजारी शमीचे झाड लावून त्याचे वर्षभर संगोपन करावे असे आवाहन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी यावेळी बोलताना केले.

  • राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा निकाल :

एक ते पाच क्रमांक – १.राष्ट्रतेज तरुण मंडळ काळभोर नगर, चिंचवड – महिला संतोष देखावा- एकावन्न हजार रुपये. २ . श्री संत सावतामाळी तरुण मित्र मंडळ जाधववाडी चिखली – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले – पंचेचाळीस हजार रुपये. ३. अखिल मंडई मित्र मंडळ भाजी मंडई चिंचवड- माणुसकीचा देखावा- पस्तीस हजार रुपये,.४. आनंद पार्क मित्र मंडळ डांगे चौक – विसलरेले आई-वडील- तीस हजार रुपये, ५. त्रिमुर्ती मित्र मंडळ – सांगितिक गणेश – पंचवीस हजार रुपये.

लाईफ टाईम पुरस्कार – १. पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ – दहा हजार रुपये, जय बजरंग तरुण मंडळ निगडी गावठाण – दहा हजार रुपये, जयहिंद मित्र मंडळ निगडी प्राधिकरण – दहा हजार रुपये, एस.के.एफ मित्र मंडळ – दहा हजार रुपये, गांधीपेठ तालीम मित्र मंडळ – दहा हजार रुपये. गांधीपेठ तालीम मित्र मंडळ – दहा हजार रुपये. अ प्रभागात प्रथम एक ते पाच क्रमांक – दक्षता तरुण मंडळ – खरा हिरो कोण? – पंचवीस हजार रुपये, नागश्वेर मित्र मंडळ – मरावे परी अवयव रुपी उरावे – बावीस हजार पाचशे रुपये, वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल – सरकार मस्त, जनता त्रस्त – वीस हजार रुपये, खंडोबा माळ मित्र मंडळ – जागर स्त्री शक्तीचा – सतरा हजार पाचशे, हनुमान तरुण मंडळ- सत्यवान सावित्रीचा महिमा – पंधरा हजार रुपये.

ब प्रभाग – ज्ञानदिप मित्र मंडळ – भारतीय राष्ट्रध्वजाची उत्क्रांती – पंचवीस हजार, मोरया मित्र मंडळ ट्रस्ट – किल्ला रायगड-बावीस हजार पाचशे, हनुमान तरुण मित्र मंडळ – संत भार पंढरीत-वीस हजार रुपये, शिवराजे प्रतिष्ठान – सामाजिक वास्तव्य-सतरा हजार पाचशे, उत्कृष्ट तरुण मंडळ – श्री स्वामी समर्थ यांचा साक्षात्कार – पंधरा हजार रुपयांचे पारितोषिक.

क प्रभाग – १. समस्त गव्हाणे तालीम मंडळ – संत ज्ञानेश्वर माऊलीचे जीवन चरित्र – पंचवीस हजार रुपये, २. लांडगे लिंबाची तालीम मंडळ – श्री शिवराज्यभिषेक सोहळा – बावीस हजार पाचशे रुपये, सिध्दी विनायक प्रतिष्ठान – संत गोरा कुंभाराची विठ्ठल भक्ती- वीस हजार रुपये, ३. लोंढे तालीम मित्र मंडळ – ज्वालासुराचा जन्म आणि मृत्यू – सतरा हजार पाचशे.

ड प्रभाग – १. जय महाराष्ट्र मित्र मंडळ – आता तरी जागे व्हा – पंचवीस हजार, २. आझाद मित्र मंडळ – गड आला पण सिंह गेला – बावीस हजार पाचशे, ३.सम्राट मित्र मंडळ – गडकिल्ले संवर्धन – वीस हजार रुपये. ४. अनंतनगर तरुण मित्र मंडळ – पावनखिंडीचा रणसंग्राम – सतरा हजार पाचशे, ५. डी वार्ड फ्रेंड सर्कल – रामलीला देखावा – पंधरा हजार रुपये.

जीवंत देखावा एक ते पंधरा क्रमांक प्रत्येकी दहा हजार रुपयांचे पारितोषिक – श्री साईनाथ तरुण मंडळ – वर्गणीदार हेच सुखकर्ता व दुखकर्ता, रावेत नागरी प्राधिकरण समिती – जागर जाणिवांचा, श्री चिंतामणी मित्र मंडळ – पर्यावरण साक्षरता, नाव प्रगती मित्र मंडळ – ध्यास कर्मयोगी विचारांचा , ध्यास मानवतेच्या विचारांचा, आनंदनगर सार्वजनिक गणेशोत्सव – नामदेव महाराजांची अपारभक्ती, जय महाराष्ट्र मित्र मंडळ – मातृ देवो भव : पितृ देवो भव :, विशाल मित्र मंडळ – सैराट छंद, प्लास्टिक बंद. तुळजामाता मित्र मंडळ – हिच का श्रींची इच्छा, आदर्श मित्र मंडळ – शल्य. शिवशक्ती मित्र मंडल – स्वराज्य ते सुराज्य. स्वराज्य मिक्ष मंडळ – इंटरनेटचे दुष्परिणाम पालक व सोशल मिडिया. नरवीर तानाजी मित्र मंडळ – शिक्षणाचा बाजार, श्रीकृष्ण तरुण मित्र मंडळ – राजे, तुम्ही असता तर ? जाणता राजा ग्रुप – प्लास्टिक टाळा, निसर्गाचे नियम पाळा.

स्थिर व हलता देखावा एक ते पंधरा प्रत्येकी दहा हजार रुपयांचे पारितोषिके – दामुशेठ गव्हाणे मित्र मंडळ – बेटी बचाव बेटी पढाव, राही माई प्रतिष्ठान – होलिका राक्षसनीचा वध, उत्कर्ष मित्र मंडळ – सोमनाथ मंदिर, शिवराय मित्र मंडळ – वामन अवतार, श्री शिवछत्रपती तरुण मंडळ ट्रस्ट – भक्त प्रल्हादाची विष्णू भक्ती, लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्र मंडळ-आयुष्यावर बोलू काही, जागृती मित्र मंडळ – कलियुगाचा वासुदेव. भोजेश्वर मित्र मंडळ – एक पाऊल निरोगी आरोग्यासाठी, सेवा विकास मित्र मंडळ – रायगड हिरकणीचा महल, मधुबन मित्र मंडळ – मल्हारी मार्तंड महल, तरुण मित्र मंडळ – कोणार्क मंदिर, श्री छत्रपती शाहू तरुण मंडळ – रामायण, श्री राम लक्ष्मणाची नागपाशातून मुक्तता, नव महाराष्ट्र तरुण मंडळ – गजमहाल. नवयुग मंडळ – रेडयामुखी वेद, नवज्योत गणेश मित्र मंडळ – व्हाईट हााऊस.

उल्लेखनीय एक ते दहा प्रत्येकी पाच हजार रुपये क्रमांकाचे पारितोषिक – श्री शिवछत्रपती शिवाजी मित्र मंडळ – पर्यावरण पूरक फुलांची सजावट, बिजलीनगर युवा प्रतिष्ठान – व्यसनमुक्ती, ढोरेनगरर मित्र मंडळ – सर्जिकल स्ट्राईक. श्रीमंत छत्रपती तरुण मंडळ – छत्री केली पर्वताची अगाध लीला श्रीकृष्णाची , एकदंत मित्र मंडळ – शिवकालीन न्यायव्यवस्था, स्वराज्य प्रतिष्ठान – गोरक्षनाथाचा जन्म, आझाद मित्र स्पोर्टस क्लब – दैनंदिन जीवनांत घ्यावयाची काळजी, नवजीवन मित्र मंडळ – राजवाडा, सन्मित्र क्रिकेट क्लब – फुलांची सजावट, कावेरीनगर पोलीस युवक मित्र मंडळ – सजावट फुलांची आरास, श्री. शिवछत्रपतीशिवाजी मित्र मंडळ – होलिकेचा वध, छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळ – नृसिंह अवतार, फुगे माने तालीम मंडळ – गडसंवर्धन. शिवप्रेमी तरुण मंडळ – गंगावतरण, आझाद मित्र मंडळ – बळीराजा, गणेश मित्र मंडळ – गजमहाल,. अष्टविनायक मित्र मंडळ – काल्पनिक देखावा, जय हनुमान युवा प्रतिष्ठान – दुध सागर धबधबा, सिंह गर्जना मित्र मंडळ – स्त्रीसक्षमीकरण, श्री हनुमान व्यायाम मंडळ – आई.

विद्युत रोषणाई देखावा प्रत्येकी पाच हजार रुपये – जय महाराष्ट्र व्यायाम मंडळ ट्रस्ट, कासारवाडी. राजश्री छत्रपती शाहू महाराज मित्र मंडळ, कृष्णा चौक, सांगवी. अमर तरुण मंडळ , पुनावळे. गणेशा मित्र मंडळ , शिंदे वस्ती रावेत, सिझन ग्रुप सोशल वेलफेअर ट्रस्ट, सांगवी, अमरदिप तरुण मंडळ, पिंपरी गावठाण, शिवाजी पुतळ्याजवळ, ज्योतिबा तरुण मंडळ, तळवडे, नवयुग तरुण मंडळ मोरवाडी गावठाण, गणेश तरुण मित्र मंडळ, दिघी गाव.

सुवर्ण महोत्सव वर्ष पाच हजार रुपये – सुभाष मित्र मंडळ, चिखली. निसर्गप्रेमी पर्यावरणीय देखावे – पाच हजार रुपये प्रत्येकी – १. समतानगर मित्र मंडळ, मोशी प्राधिकरण २. मोरया कॉलनी तिरंगा मित्र मंडळ, काळेवाडी. ३ . पागेची तालीम मित्र मंडळ. सोसायटी प्रत्येकी पाच हजार रुपये – जयराज रेसिडेन्सी सोसायटी फेज २ जुनी सांगवी. यशोम लाईफ स्पेसेस सोसायटी, शिंदे वस्ती, रावेत, ३. रॉयल कासा सोसायटी, रावेत. ४. नॅनो स्पेसेस सोसायटी – रावेत, ५. आदित्य टेरेस सोसायटी – रावेत. ६. रॉयल व्हिजन सोसायटी- रावेत. ७. रेणुका वृंदावन सोसायटी-वाल्हेकरवाडी.८ – शुभम युवक मित्र मंडळ – निगडी, प्राधिकरण.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.