Nigadi : व्यवसायातील भागीदारी परस्पर रद्द करून महिलेची 43 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्यवसायातील भागीदारी भागीदार महिलेच्या परस्पर रद्द करून चौघांनी मिळून तब्बल 43 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 22 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2019 या दरम्यान घडला.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सवाराम देवासी (वय 32), चैनी देवासी (वय 30) स्मिता देशमुख (वय 39, तिघे रा. ओम चौक, चिंचवड), योगेश देशमुख (वय 43) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची ग्लोबल फर्मा कंपनीत आरोपींसोबत भागीदारी आहे. आरोपींची फिर्यादी यांची कंपनीमधील भागीदारी रद्द केली. त्यानंतर आरोपींनी कंपनीच्या खात्यावरून 40 लाख रुपयांचा धनादेश (चेक) फिर्यादी यांना कोणतीही माहिती नसताना दिला. तसेच काही कागदपत्रांचे बनावट दस्त ऐवज बनवून फिर्यादी यांची फसवणूक केली.

फिर्यादी यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली 43 लाख 39 हजार रुपयांची रक्कम आरोपींनी परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.