सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Nigdi accident: निगडी येथे कारच्या धडकेत पदचार्‍याचा मृत्यू

Breaking News : निगडी येथे एका कारने पदचार्‍यास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.(Nigdi accident) पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना काही तासांपूर्वी पुणे – मुंबई महामार्गवरील निगडी येथील मधुकरराव पवळे उड्डाणपूलाखाली टिळक चौक जवळ घडली आहे.

 

जखमी पादचाऱ्याला  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्याला तेथे डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले होते.(Nigdi accident) त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विश्व्जीत खुले, पोलीस निरीक्षक, गुन्हे, निगडी पोलीस ठाणे यांनी सांगितले की, या घटनेसंबंधी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

spot_img
Latest news
Related news