Nigadi : तडीपार आरोपीला अटक; खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – निगडी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराला खंडणी दरोडाविरोधी पथक गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. २१) ओटास्किम, निगडी येथे करण्यात आली. 

लखनसिंग कांचनसिंग जुन्नी (वय 32, रा. ओटास्कीम निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनसिंग याच्यावर निगडी पोलिस ठाण्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्याच्या अगोदर तो ओटास्कीममधील अंकुश चौक येथे थांबला असल्याची माहिती पोलीस नाईक प्रवीण कांबळे व आशिष बनकर यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून लखनसिंग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पुणे जिल्ह्यात येण्याबाबत परवानगी घेतल्याची चौकशी केली असता त्याने कोणतीही परवानगी न घेता जिल्ह्यात आल्याचे सांगितले. यावरून त्याला अटक करण्यात आली आहे.

  • ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, गणेश हजारे, उमेश पुलगम, प्रवीण कांबळे, आशिष बनकर, गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.