Nigadi : प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या स्वयंसेवकांना महापौरांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान

एमपीसी न्यूज – आकुर्डी रेल्वे स्थानकावर १६ मे २०१९ रोजी प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक, पोलीस मित्रांचा सन्मान १ जून २०१९ रोजी महापौर यांचे दालनामध्ये करण्यात आला.

अनुप मोरे सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन आणि महापौर पिंपरी-चिंचवड महापालिका यांचे संयुक्त विद्यमानाने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती महापौर राहुल जाधव, माजी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, आर. एस. कुमार, माहिती आणि जनसंपर्क सहायक आयुक्त आण्णा बोदडे, सामाजिक कार्यकर्ते प्रसेन अष्टेकर आदींची होती.

  • संत साहित्याचे अभ्यासक श्रीमती मंगला घाळी, देवयानी पाटील, अर्चना दाभोळकर, समिती अध्यक्ष विजयकुमार पाटील, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, अमित डांगे, जयप्रकाश शिंदे, जयेंद्र मकवाना, समीर चिले, तेजस सापरिया, नितीन मांडवे, मौसमी घाळी या दक्ष समिती पोलीस मित्र स्वयंसेवकांचा महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी महापौर राहुल जाधव म्हणाले, “सतत व्यस्त असणाऱ्या आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरामध्ये मानवतावादी दृष्टीकोनातून प्रसूत महिला आणि बाळाला तातडीने मदत मिळाल्याने दोन जीवांना जीवदान मिळाले, अशी घटना शहराच्या इतिहासात विरळच. स्वयंसेवकांच्या तत्परतेमुळे दोघे माय-लेक सुखरूप रुग्णालयात पोहचले. महापालिकेला ह्या स्वयंवसेवकांचा सार्थ अभिमान वाटतो.”

  • माजी उपमहापौर नगरसेविका शैलजा मोरे म्हणाल्या,”प्राधिकरण तसेच शहर परिसरात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या सदस्यांचे कार्य अतुलनीयच आहे. सुरक्षा समितीचे पोलीस मित्र कायमच सतर्क व दक्ष असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे नागरिक सेवेकरिता त्यांचा सन्मान आज रोजी करण्यात आला. स्वयंसेवकाना पालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य केले जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.