Nigadi : लाकडी कपाट फोडून साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

एमपीसी न्यूज – घरातील बेडरूममधील लाकडी कपाट फोडून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 67 हजार 600 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 30) पहाटे आकुर्डी भाजी मंडईजवळ उघडकीस आली.

ज्योती सोपान गायकवाड (वय 52, रा. स्वानंद अपार्टमेंट, आकुर्डी. मूळ रा. बोरगाव, जि. सांगली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी भाजी मंडईजवळ स्वानंद अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक चारचे मुख्य दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातून 3 लाख 67 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.