Nigadi : भाजप युवती आघाडीच्या वतीने कॅंडल मार्च

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे. त्या चिमुकलीच नाव ट्विंकल शर्मा असून तिच्या या घटनेने देशभरातून संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. ट्विंकला न्याय मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी निगडी येथे भाजप युवती आघाडीच्या वतीने कॅंडल मार्च काढण्यात आला.

निगडी प्राधिकरण येथे रविवारी (दि. 9 जून) भाजप युवतीच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम यांच्या नेतृत्वाखाली हा कॅंडल मार्च मोर्चा काढण्यात आला.

  • रविवारी निर्भिया झाली. असीफा झाली आज ट्विंक शर्मा झाली. आता कोण ? ….आहे का सुरक्षित ?. इथे घरातल्या भिंतीतच भिंती फोडल्या जातात ..केला जातोय नायनाट त्याच्या अब्रूचा …तुला न्याय मिळावा. हे एका माणुसकीच्या नात्याने इथं धर्म, जात ह्याचा प्रश्न नाही ..तू एक जीव होतीस ह्या जीवास न्याय मिळावा ….. अशा आशयाचे पोस्टर या कॅंडल मार्चमध्ये होते. यातूनच त्या निर्भया ट्विंकल शर्माला तरी न्याय मिळेल का ही एकच मागणी यावेळी भाजप य़ुवतीच्या वतीने करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.