BRTS route: निगडी – दापोडी बीआरटीएस रूट वरील बीआरटी बस व बस थांब्यांवरील आयटीएमएस सिस्टिम बंद असल्याने प्रवाश्यांना त्रास

एमपीसी न्यूज: पुणे – मुंबई महामार्गांवरील निगडी – दापोडी बीआरटीएस रूट वरील बीआरटीएस बस व बस थांब्यांवरील आयटीएमएस सिस्टिम बंद असल्याने (BRTS route) प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल ) व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुमारे 7 ते 8 वर्षांपूर्वी पुणे – मुंबई महामार्गावरील निगडी – दापोडी दरम्यान प्रवाश्यांना जल्द बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बीआरटीएस बस सेवा सुरु केली होती. यामध्ये बीआरटीएस बस मार्ग हा महामार्गामधून जातो व त्यावरून जाणाऱ्या बसचे दरवाजे उजव्या बाजूस आहेत व बस थांबा रोडपासून उंचावर आहे. या मार्गावरील बस मध्ये इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) प्रणाली चालू होती. ज्यामध्ये बस मधील प्रवाशांना पुढचा स्टॉप कोणता आहे तो पब्लिक ऍड्रेस सिस्टिम वर आतमध्ये सांगितला जात असे. तसेच बस स्टॉप चे दरवाजे बस तेथे थांबल्यानंतरच उघडत असे.

 

आज एमपीसी न्यूज च्या वार्ताहाराने या मार्गावर बस मध्ये प्रवास केल्यानंतर अनुभवले की ही आयटीएमएस प्रणाली बंद असून त्यामुळे प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे.(BRTS route) बीआरटीएस बस मध्ये पुढचा स्टॉप कोणता आहे तो पब्लिक ऍड्रेस सिस्टिम वर आतमध्ये सांगितला जात नाही. कंडक्टरलाच ते सांगावे लागते किंवा प्रवास करत असलेल्या व्यक्तीला कंडक्टरला अथवा सहप्रवाशांना विचारावे लागत आहे.

Pimpri News:  ‘बीआरएसपी’च्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

बीआरटीएस बस थांब्यावरील डॉकचे दरवाजे फक्त बस तेथे थांबल्यावरच उघडत व बस गेल्यावर ते बंद होत असत. बीआरटीएस बस कोणत्या डॉक वर कोणती बस येत आहे हे पूर्वी पब्लिक ऍड्रेस सिस्टिम वर सांगितले जात असे. पण आता ते होत नसल्याने प्रवासी दरवाज्या बाहेर थांबून बसची वाट पाहतात व बघतात की कोणती बस येत आहे व कुठे जाणार आहे.(BRTS route) असे करताना कुणाचा पावसामुळे पाय घसरून खाली रोडवर पडून जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काही बस थांब्यावर कोणत्या डॉकवर कोणती बस येणार आहे त्या मार्गांची लिस्ट लावलेले पत्रक नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी तशी लिस्ट संबंधित डॉकजवळील स्टील फ्रेमवर लिहिले आहे.

 

यासंबंधी प्रवासी यश शिंदे याला विचारल्यावर तो म्हणाला की, बस थांब्यावरील दरवाजे नेहमीच उघडे असतात. प्रवासी उघड्या दरवाज्यात कडेला थांबून बसची वाट पाहतात. त्यामध्ये पावसामुळे पाय घसरून खाली पडू शकतात. प्रवासी मंगला जाधव म्हणाल्या की, बस थांब्यावर कोणत्या डॉकवर कोणती बस थांबते त्याची लिस्ट नसल्याने येथे थांबणाऱ्या इतर प्रवाश्यांना विचारावे लागते किंवा येथील सुरक्षा रक्षकाला विचारावे लागते.(BRTS route) यासंबंधी सतिष घाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल यांना विचारले असता ते म्हणाले की, आज कार्यालयीन सुट्टी आहे. त्यांनी आयटीएमएस विभागाचे अधिकारी दत्तात्रय झेंडे यांना विचारण्यात सांगितले. झेंडे यांना फोन केल्यावर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटीएस विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना फोन केल्यावर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.