Nigadi : शिवसेना वर्धापनदिनानिमित्त साडेतीनशे नागरिकांना होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप

Distribution of homeopathy pills to three and a half hundred citizens on the occasion of Shiv Sena anniversary

एमपीसीन्यूज : शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन निगडी – यमुनानगर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या परिसरातील सुमारे साडेतीनशे नागरिकांना होमियोपॅथी CAMPHORA बूस्टर गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आणि शिवसेनेचे विभागप्रमुख सतीश मरळ-देशमुख यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यमुनानगर येथील घरोघरी जाऊन नागरिक आणि व्यापाऱ्यांना CAMPHORA बूस्टर गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच तळवडे येथील महापालिकेच्या कर संकलन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा या गोळ्या देण्यात आल्या.

यमुनानगर शिवसेना शाखा येथे सुलभा उबाळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी भोसरी विधानसभा अध्यक्ष धनंजय आल्हाट, सचिन सानप, तुषार सहाणे, विभाग प्रमुख सतीश मरळ, उपविभाग प्रमुख गणेश इंगवले, अंकुश जगदाळे, शाखाप्रमुख कौस्तुभ गोळे, महेश डोके,नारायण कोरवी, गणेश धननायक आदींसह सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.