Nigadi : डॉ. नंदकिशोर कपोते यांची केंद्राच्या कलाकार पॅनलवर निवड

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांची दिल्ली येथील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (इंडिअन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन) भारत सरकार विदेश मंत्रालय यांच्या कलाकार पॅनलमध्ये कथक सोलो नृत्यासाठी सभासद म्हणून नुकतीच निवड करण्यात आली.

ही निवड कायमस्वरूपी आहे. याद्वारे सांस्कृतिक देवाणघेवाण अंतर्गत परदेशात जाऊन भारतीय शास्त्रीय नृत्य कथकशैलीचा प्रचार आणि प्रसार करता येणार आहे. याआधी डॉ नंदकिशोर कपोते हे रशिया, अमेरिका, जपान कॅनडा हॉलंड, कुवेत इत्यादी देशात कथक नृत्य कार्यक्रम सादर केले आहे.

  • डॉ. कपोते यांना ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार, अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची राष्ट्रीय शिष्यवृती, भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची फेलोशिप ही डॉ. कपोते यांना मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात नंदकिशोर कल्चरल सोसायटीची स्थापना करून त्याद्वारे कथक नृत्याचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य अनेक वर्षांपासून डॉ. प.नंदकिशोर कपोते करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.