Nigadi : कोरोना संकटामुळे मिळकत करात 50 टक्के सवलत द्या : सतीश मरळ

Give 50 per cent relief in property tax due to corona crisis: Satish Maral : मिळकत कर भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी

एमपीसीन्यूज : कोरोना संकटामुळे पिंपरी चिंचवड शहरात गेल्या तीन महिन्यांपासून पूर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासनाने मिळकत करात 50 टक्के सवलती द्यावी, अशी मागणी शिवसेना यमुनानगर विभागप्रमुख सतीश मरळ यांनी केली आहे.

याबाबत मरळ यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. मार्च महिन्यात पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर २२ मार्चपासून पिंपरी चिंचवडसह देशभरात कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला.

जवळपास अडीच महिने नागरिक घरी बसून होते. त्यामुळे नोकरदार आणि व्यावसायिक तसेच सर्व सामान्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

या सर्वांच्या उत्पन्न आणि पगारात निम्म्याने कपात करण्यात आली. काहींना तर नोकऱ्याही गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे संबंधितांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करुन मिळकत करात 50 टक्के सवलती द्यावी, तसेच ही रक्कम भरण्यासाठी सक्ती करू नये. या वर्षीचा मिळकत कर भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही मरळ यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.