Nigadi : आयबीसी प्रिमियर क्रिकेट लिगचे महापौर यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज – आयबीसी प्रिमियर क्रिकेट लिग-4 चे निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदान येथे महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते उदघाचन झाले. मागील ३ वर्षाच्या यशस्वी नियोजना नंतर २०१९ च्या पर्व ४चे आयबीसी प्रिमियर क्रिकेट लिग महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते टॉस करुन उदघाटन झाले.

यावेळी स्थानिक नगरसेवक अमित गावडे, वसंत ग्रुपचे अनिल मित्तल, आयबीसीचेचे नितेश मकवाना, अभय खिवसंरा, दिलीप मॅथ्यू, कैलासजी पारेख आणी सर्व टिम सदस्य उपस्थित होते.

  • यावेळी बोलताना महापौर म्हणाले, आयबीसी प्रिमियर क्रिकेट लिगच्या माध्यमातून कंपनीत काम करणा-या कामगारांना खेळांची अत्यंत गरज असून खेळामुळे शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. ही लिग दि.23 आणि 24 फेब्रुवारी दोन दिवस चालणार असून, त्यामध्ये एकूण ८ संघ सहभागी असून, सर्व मॅच 8 ओव्हर होणार आहेत. या लिगचा बक्षीस समारंभ दि. 24 फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.