Nigadi: आंतरराष्ट्रीय नृत्य दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – नंदकिशोर कल्चरल सोसायटी आणि अखिल भारतीय शास्त्रीय नृत्य परिषद यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त शास्त्रीय नृत्याचा दैदिप्यमान सोहळा नंदकिशोर सभागृह, निगडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील सर्व शास्त्रीय नृत्य गुरू आणि नृत्य कलाकार ह्यात सहभागी झाले होते. एकाच रंगमंचावर शास्त्रीय नृत्याच्या विविध शैलीचे दर्शन घडले. कलाकारांनी यात कथक, भरतनाट्यम, ओडिसी, मोहिनीअट्टम, कुचिपुडी अशी विविध शास्त्रीय नृत्य सादर केली.एकूण १०० कलाकारांनी ह्यात सहभाग घेतला होता.

  • कथक नृत्याचा डोळे दिपवणारा नृत्याविष्कार डॉ. पं. नंदकिशोर कपोते व वैशाली पळसुले, विदुला हरिप, शिल्पा भोमे, भावना गौड, स्नेहल सोमण, मिलिंद कुमार घरडे, मिलिंद रणपिसे, प्राची पाचघरे, पद्मिनी सोनवणे, सुमेधा गडेकर यांनी सादर केला. तर, भरतनाट्यमचा अप्रतिम नृत्याविष्कार गीता शर्मा, सायली कचरेकर, वासंती निकम यांनी केला. आगळे वेगळे ओडिसी नृत्य कुचिपुडी व मोहिनीअट्टम नृत्य वरदा वैशंपायन, चिप्पी पदमकुमार यांनी सादर करून आपले नृत्यकौशल्य दाखवले.

ज्येष्ठ कलाकार डॉ. नंदकिशोर कपोते यांनी ठुमक चलत रामचंद्र ह्या भजनावर विलोभनीय नृत्याविष्कार सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. एकाच रंगमंचावर शहरातील सर्व नामवंत कलाकारांचे नृत्य पहाण्याची शहरवासीयांना एक सुवर्णसंधीच मिळाली. अशा प्रकारचा सर्व नृत्य कलाकारांनी एकत्र येऊन नृत्य सादर करणे, असा कार्यक्रम शहरात डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या सहकार्याने प्रथमच होत आहे. यावेळी निवेदन शोभा पवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.