Nigdi News : ‘भक्ती शक्ती उद्यानात नागरिकांना प्रवेश बंदी करा’

0

एमपीसीन्यूज : निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानात शनिवारी आणि रविवारी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांना येथे प्रवेश बंदी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रामेशन यांनी केली आहे.

या संदर्भात रामेशन यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन पाठविले आहे. सध्या सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत निर्बंध लादण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानात रविवारी सायंकाळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यामध्ये अनेक नागरिकांकडून कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी मास्कही वापरला नव्हता.

सोशल डिस्टंसिंगचा   फज्जा उडाल्याचे दिसून आले. आता शाळा बंद झाल्याने ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत भक्ती शक्ती उद्यानात नागरिकांना प्रवेश बंदी करण्याची मागणी रमेशन यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment