Nigdi News : विद्यार्थ्यांनो, कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करा – अन्सार शेख

एमपीसी न्यूज: यमुनानगर, निगडी येथील मॉडर्न हायस्कूल शाळेच्या पहिल्या दिवसाचा पहिला तास यमुनानगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अन्सार शेख यांनी घेतला. विद्यार्थ्यांनी यापुढे कोरोनाबाबत काळजी घेतली पाहिजे, तसेच शासनाने सांगितलेल्या सर्व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना विद्यार्थ्यांनी अंगिकारल्या पाहिजेत, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

यावेळी संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, संस्था सदस्य राजीव कुटे, सुरेखा कामथे, गंगाधर सोनवणे, दिलीप गुंड, गंगाधर वाघमारे, हनुमंत तापकीर, अमोल नवलपुरे, रामचंद्र घाडगे, प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.

शासन परिपत्रकाप्रमाणे नववी ते दहावीचे वर्ग पन्नास टक्क्यांनी भरवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझर यांचा वापर न चुकता करावा. स्वत: बरोबर स्वत:च्या कुटुंबियांनादेखील नियम पाळण्यास सांगावे, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख यांनी सांगितले.

तसेच शाळा सुरू झाल्यावर शाळेबाहेर बेशिस्त वर्तन करणा-या मुलांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

मुख्याध्यापक गोकुळ कांबळे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शंभर दिवस शाळा भरणार असल्याचे सांगितले. दहावीच्या परीक्षा मे मध्ये होणार असल्याने कमी वेळेत जास्त अभ्यास करण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.