Nigadi News : शिवसेनेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण

एमपीसीन्यूज : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना यमुनानगर- निगडी प्रभागाच्यावतीने ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.

यमुनानगर येथे   हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच शिवसेना भोसरी प्रमुख धनंजय आल्हाट, उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी, यमुनानगर-निगडी विभागप्रमुख सतीश मरळ, उपविभाग प्रमुख गणेश इंगवले, शाखाप्रमुख महेश डोके आदींनीही ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.