Nigadi: संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची उद्योगनगरीतील क्षणचित्रे

एमपीसी न्यूज –
                सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
                गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
               विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
               तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

आज (मंगळवारी, दि. 25) ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत पंढरीला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले. निगडी येथे पालखी येताच अनेक भाविकांनी दर्शनासाठी एकाच गर्दी केली यावेळी भाविकांनी विठू नामाचा गजर करत सहभाग घेतला. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा मुक्काम आकुर्डीत असणार आहे. उद्या (बुधवारी, दि. 26) पालखी पुण्यनगरीत प्रवेश करणार आहे.

  • विठू नामाचा गजर… टाळ मृदुंगाचा निनाद…. तुकोबा-तुकोबा नामाचा अखंड गजर… अन् मनी विठुरायाच्या भेटीची आस… अशा भक्तिरसपूर्ण वातावरणात अनेक वारकरी सहभागी झाले आहेत.
_MPC_DIR_MPU_II

यावेळी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या आणि भक्तिरसात चिंब झालेल्या वारकरी यांची क्षणचित्रे टिपली आहेत ‘एमपीसी न्यूज’चे छायाचित्रकार सुरेश साठे यांनी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.