Senior citizen cheated: गुंतवणूकीवर पाच एकर जमीन देतो म्हणत ज्येष्ठ नागरिकाची पावणे 16 लाखांची फसवणुक

एमपीसी न्यूज : केलेल्या गुंतवणूकीवर पाच वर्षात दाम दुप्प्ट किंवा चक्क पाच एकर जमीन देतो अशी बतावणी करुन एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल पावणे सोळा लाखांची फसवणूक केली आहे.( Senior citizen cheated) हा प्रकार 21 नोव्हेंबर 2007 ते  9 ऑगस्ट 2022 या 15 वर्षांच्या कालावधीत घडला आहे.

 याप्रकरणी बिनॉय अब्दुल करीम जाफर (वय.42  रा.निगडी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली असून टी.पी. अलेक्सझेंडर (वय.82), रॉवीन अलेक्सझेंडर (वय.49) दोघेही राहणार धानोरी यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon : हेमलता शहा यांचे निधन

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांची आरोपींनी वेळोवेळी फसवणूक करत त्यांना पाच वर्षात दाम दुप्पट करुन देतो किंवा पाच एकर जमीन देतो म्हणत 15 लाख 75 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.मात्र 15 वर्ष उलटून गेले तरी कोणताच परतावा न दिल्याने फिर्यादींच्या वडिलांची आर्थिक फसवणूक केली. (Senior citizen cheated) यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.