Nigdi News : अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; शिवसेनेची निगडी पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य सेनानी व देशाचा अवमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा करा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निगडी पोलिसांकडे केली आहे. शिवसेना शिरूर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे (गुन्हे) यांना आज (शनिवार, दि.13) याविषयी निवेदन दिले आहे.

‘भारताला 1947 रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक म्हणून मिळाले, खरे स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले’ असे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने एका वृत्त वाहिनी वर मुलाखत देताना केले. कंगना राणावत हिने स्वातंत्र्य सैनिक व देशासाठी शहीद झालेल्या शहीदांचा अवमान केला आहे. अशी सतत वादग्रस्त विधाने करणा-या कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.