Nigadi : केस कापण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – आते भावासोबत केस काढण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलावर दोघांनी चाकूने वार केले. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 3) दुपारी एकच्या सुमारास चिकन चौकाजवळ निगडी येथे घडली.

समाधान दत्तात्रय केंदळे (वय 17, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लखन सातव (वय 25), नितीन चंदनशिवे (वय 23, दोघे रा. ओटास्कीम निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान सोमवारी दुपारी एकच्या सुमारास त्याचा आतेभाऊ संकेत मारुती हनुमंते वय 10 याच्यासोबत केस कापण्यासाठी चिकन चौकातील हेअर सलूनमध्ये गेला. त्यावेळी आरोपींनी समाधान याला ‘तू आमच्याकडे का पाहिलेस’ असे म्हणत शिवीगाळ केली आणि हेअर सलूनमधून बाहेर ओढत आणून मारहाण केली.

आरोपींनी लोखंडी चाकूने समाधान याच्या डाव्या हातावर आणि डोक्यात मारून गंभीर जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.