Nigadi : स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने 16 हजार ‘अर्सेनिक अल्बम’ या गोळ्यांचे वाटप

Swarsamrat Pralhad Shinde Charitable Trust distributes 16,000 'Arsenic Album' tablets

एमपीसीन्यूज – पोलिस बांधव, शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या आरोग्यासाठी 16 हजार ‘अर्सेनिक अल्बम’ या गोळ्यांचे व काही गरजूंना अन्नधान्य किट वाटप करत पार्श्वगायक आदर्श आनंद शिंदे, हर्षद आनंद शिंदे व गायक – संगीतकार डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी त्यांचे आजोबा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले.

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने पिंपरी (पुणे ), सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, पिंपरी येथे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

‘चल ग सखे पंढरीला’ म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या हदयावर राज्य करणा-या स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा काल, मंगळवारी 16 वा पुण्यस्मरण दिन होता.

यानिमित्त स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक उपक्रम राबवून प्रल्हाद शिंदे यांना अभिवादन करण्यात आले.

कोरोना महामारीत नागरिकांच्या आरोग्यासाठी लढणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

तसेच महाराष्ट्रातील मंगळवेढा, सोलापूर या भागातील शेतकरी कष्टकरी कामगार बांधव यांनाही प्रल्हाद शिंदे यांचे नातू हर्षद शिंदे ह्यांच्या हस्ते या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

राज्यभरात एकूण 16 हजार गोळ्यांच्या डब्या व काही गरजूना अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे सभासद व शिंदेशाहीवर प्रेम करणाऱ्या बांधवानी या उपक्रमात सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.