Nigadi : पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हुज्जत घातली. तसेच पोलिसांच्या वाहनांची काच फोडली. ही घटना भेळचौक निगडी प्राधिकरण येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली.

राहुल प्रल्हाद पाटील (वय 25), शुभम प्रल्हाद पाटील (वय 27), अमित शांतीलाल पाटील (वय 27, सर्व रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

  • याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शकूर मोहम्मद फकीर मोहम्मद तांबोळी यांनी फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार तांबोळी त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत भेळ चौक निगडी प्राधिकरण येथे नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून (एमएच 39 आर 8636) तिघेजण जात होते. वाहनचालक परवाना न बाळगता वाहन चालवत असल्याने तसेच ट्रिपल सीट आणि रॅश ड्रायव्हिंग करत असल्याने तांबोळी यांनी त्यांना थांबवले.

  • तरुणांनी तांबोळी आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. तसेच पोलिसांच्या खासगी वाहनाची काच फोडली. यावरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.